गुजरातमध्ये भाजपकडून रेमडेसिवीरचे निःशुल्क वाटप

अहमदाबाद - गेली पाच दिवस सुरतमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सुरतमधील भाजप कार्यालयाकडून रेमडेसिवीरचे मोफत वाटप करण्यात येत आहे. ही इंजेक्शन घेण्यासाठी कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांनी लांबलचक रांग लावली असून, रांग थेट अर्धा किलोमीटरपर्यंत गेली आहे. कोरोनाबाधितांना रेमडेसिवीर मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरातील सिव्हिल रुग्णालयाबाहेरही रुग्णांच्या नातेवाईक रांगेत उभे राहून रेमडेसिवीर मिळण्याची प्रतिक्षा करत आहेत.गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुजरातला ३ लाख इंजेक्शन मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. तर गुजरात भाजपचे अध्यक्ष सी. आर. पाटील यांनी रुग्णालयाबाहेर भाजपचे कार्यकर्त्यांकडून गरजुंना मोफत इंजेक्शन देणार असल्याचे जाहीर केले. या घोषणेनंतर भाजप कार्यालयाबाहेर कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.सुरत येथील भाजपचे खासदार दर्शना जर्दोश म्हणाल्या की, गृह विलगीकरणात असलेल्यांसाठी आणि डॉक्टरांनी चिठ्ठी दिलेल्यांसाठी ही व्यवस्था आहे. सध्या सुमारे १ हजार इंजेक्शनचे वितरण करण्यात आले आहे. इतरांना टोकन दिले असल्याने त्यांना इंजेक्शन मिळू शकणार आहे. आधार कार्ड आणि डॉक्टरांची चिठ्ठी दाखविल्यानंतर गरजुंना एक इंजेक्शन देण्यात येत असल्याची माहिती दिली. गुजरात आपचे प्रवक्ते योगेश जाघवानी म्हणाले की, प्रशासनाकडून अद्याप सरकारी रुग्णालयांना इंजेक्शन मिळाले नाही. सरकारच्या यंत्रणेपेक्षा वरचढ होत भाजपने ५ हजार इंजेक्शन वाटप करण्याचे जाहीर केले. प्रशासन अपयशी ठरले तर भाजप कार्यालयाला इंजेक्शन मिळाले आहेत. यामधून विसंगती दिसून येत आहे. एफडीएच्या नियमांचे उल्लंघन करून हे इंजेक्शन वाटप करण्यात येत आहे. एवढ्या संख्येने भाजप अध्यक्षांकडे इंजेक्शन कसे आले, त्यांना परवाना कोणी दिला याची चौकशी करण्याची गरज आहे. सी. आर. पाटील हे पक्षाचा प्रचार करण्यासाठी इंजेक्शन वाटप करत आहेत. पण, महामारीत असे खालच्या स्तरावरील राजकारण करू नये, असे त्यांनी आवाहन केले आहे. काँग्रेसचे नेते अनुप राजपूत म्हणाले की, ५ हजारांचा साठा भाजप अध्यक्षाकडे कसा आला याची चौकशी करण्याची गरज आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget