राजकोटमध्ये एका ८ वर्षाच्या चिमूकलीवर बलात्कार

अहमदाबाद - गुजरातच्या राजकोटमध्ये बलात्काराची आणखी एक घटना समोर आली आहे. ८ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तीच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित आरोपी हा महाराष्ट्रातील असून तो राजकोटच्या मुंजकामध्ये एका भाड्याच्या खोलीत राहत होता. किशोर केशव तावडे असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी आरोपीला अपहरण, बलात्कार आणि पॉक्स कायद्यांतर्गत अटक केली आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. तसेचत तीला आवश्यक उपचार दिले जात आहेत. आरोपी हा एक ट्रक चालक आहे.भारतात बलात्काराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गुजरातमध्ये २ वर्षात तब्बल २७०० बलात्काराच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. विधानसभेतील कामकाजादरम्यान काँग्रेस आमदाराने ही माहिती दिली आहे. जानेवारी २०१८ ते डिंसेबर २०१९ पर्यंत सर्वांत जास्त ५४० प्रकरणे अहमदाबादमध्ये दाखल झाली आहेत. तर सर्वांत कमी ९ प्रकरणे आदिवासी भाग असेल्या बहुलदांग जिल्ह्यामध्ये बहुल दांग दाखल झाले आहेत. तसेच अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget