एनआयए प्रमुख अनिल शुक्ला यांची तडकाफडकी बदली

मुंबई - मुकेश अंबानी धमकी प्रकरणाच्या तपासात महत्वाची भूमिका बजावणारे एनआयएचे पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची मिझोरामला बदली करण्यात आली आहे. शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी सुरु होती. आतापर्यंत अनेक आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यात सचिन वाझे, विनायक शिंदे, रियाझ काझी यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत शुक्ला यांच्या बदलीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून, राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी संशय व्यक्त केला. एनआयएचे प्रमुख अनिल शुक्ला यांची बंदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी ज्ञानेंद्र वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. अनिल शुक्ला हे महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर होते. त्यांना ६ वर्षे पूर्ण झाली होती. या संपूर्ण प्रकरणापूर्वीच शुक्ला यांची बदली होणार होती. पण त्यांना काही काळ मुदतवाढ दिली गेली होती. पण आता त्यांची अचानक बदली करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.एनआयएचे प्रमुख अनिल शुक्ला यांची तडकाफडकी बदली करण्यामागे कारण काय? असा प्रश्न हसन मुश्रीफ यांनी विचारला आहे. या बदलीची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली. शुक्ला यांनी परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी केले हे केंद्राला मान्य नसावे. परमबीर सिंग माफीचे साक्षीदार होऊ इच्छित आहेत, याची आज खात्री झाली, अशा शब्दात मुश्रीफ यांनी अनिल शुक्ला यांच्या बदलीबाबत संशय व्यक्त करत भाजपवर टीका केली.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget