केरळमध्ये ६९.९५ टक्के, तामिळनाडूमध्ये ६३.४७ टक्के आणि पद्दुचेरीत ७७.९०टक्के मतदान

तामिळनाडू - कोरोनाचा संसर्ग झालेले द्रमुकचे खासदार के. कनिमोळी यांनी चेन्नईच्या मायलापूर येथील मतदान केंद्रावर पीपीई किट घालून मतदान केले. कोरोना संक्रमित रुग्णांना मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने सायंकाळी सहा ते सात यासाठी एक तासाचा वेळ दिला.केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडले. या तीनही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. केरळमध्ये ६९.९५ टक्के, तामिळनाडूमध्ये ६३.४७ टक्के आणि पद्दुचेरी ७७.९० टक्के मतदान झाले आहे.अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षाच्या बाबू मुरुगावेल यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक)चे नेते उधयानिधी स्टालिन यांच्याविरोधात मतदान करताना पक्षाचा लोगो असलेला शर्ट घातल्याची तक्रार दाखल केली.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget