मिका सिंग करणार ‘या’ अभिनेत्रीशी लग्न

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड गायक मिका सिंग अभिनेत्री आकांक्षा पुरीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावर आकांक्षा आणि मिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरुन आकांक्षा आणि मिका सिंग लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. पण दोघांनीही या सर्व अफवा असल्याचे म्हटले होते. आता आकांक्षाने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.आकांक्षाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आणि मिका सिंग गुरुद्वारामध्ये असल्याचे दिसत आहे. तेथे त्यांच्यासोबत कुटुंबातील काही व्यक्ती उपस्थित असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत आकांक्षाने ‘आशिर्वाद घेत आहोत’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. तसेच तिने हा व्हिडीओ मिका सिंगला टॅग करत हार्ट असलेले इमोजी वापरले आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत.काही दिवसांपूर्वी आकांक्षाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या सर्व अफवा असल्याचे म्हटले होते. ‘मला माहित आहे चाहते आम्हा दोघांना एकत्र पाहू इच्छितात. पण असे काही नाही’ असे आकांक्षा म्हणाली होती. सध्या आकांक्षाचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.२०१९मध्ये आकांक्षा पुरी ‘बिग बॉस १३’मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी पारस छाबडामुळे ती चर्चेत होती. त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शो मधून बाहेर पडताच दोघांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात होते. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget