ठाकरे सरकारच्या आदेशाविरोधात व्यापाऱ्यांचे बंड

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे वीकेंड लॉकडाऊनचा आदेश काढणाऱ्या ठाकरे सरकारविरोधात राज्यातील व्यापारी संघटनेने बंड पुकारला आहे. मुंबई शॉप रिटेल असोसिएशनने राज्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. दुकाने बंद राहिली तर माल सडेल. त्याची भरपाई कोण देणार? जागेचे भाडे आणि कामगारांचे पगार कोण देणार, असा सवाल फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी उपस्थित केला आहे. राज्यात एकूण १३ लाख दुकाने आहेत. यापैकी ४ लाख दुकाने मुंबईत आहेत. अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या दुकानांची संख्या अवघी ३५ हजार इतकी आहे. त्यामुळे इतर दुकाने बंद राहिल्यास व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असे विरेन शहा यांनी म्हटले. त्यामुळे आता ठाकरे सरकार व्यापाऱ्यांची समजूत कशाप्रकारे काढणार, हे पाहावे लागेल.

दरम्यान, वीकेंड लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यापारी, पत्रकार, वृत्तसंस्था, चित्रपट आणि थिएटर मालक अशा अनेक घटकांशी संवाद साधला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सध्या आर्थिक चक्र सुरु राहण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवणे महत्त्वाचे असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या या आव्हानाला सर्व घटकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तसचे मनसे आणि भाजप या विरोधी पक्षांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.

महाराष्ट्रात दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या शनिवार-रविवारी (१०-११ एप्रिल) लॉकडाऊन करण्यात येईल. तर दररोज रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू राहील. या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार आहे, मात्र त्याविषयी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. वीकेंड लॉकडाऊनच्या वेळी ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये जाऊन पार्सल नेता येणार नाही, मात्र होम डिलीव्हरीचा पर्याय उपलब्ध असेल.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget