पक्षाकडून लैंगिक छळाचा आरोप ; केरळच्या पहिल्या तृतीयपंथी उमेदवाराने घेतली माघार

तिरुवअनंतपुरम - अनन्या कुमारी अलेक्स, या केरळ विधानसभा लढवणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला आहे. आपल्याच पक्षामधून आपल्याला लिंगभेद आणि लैंगिक छळ अशा गोष्टींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप या अनन्याने केला आहे.मूळच्या वेंगारा येथील असलेल्या अनन्या कुमारी अलेक्स, मलप्पुरम जिल्ह्यातील वेंगारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार होत्या. डेमोक्रॅटिक सोशल जस्टिस पक्षाकडून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्यापूर्वीच आपण पक्षातील काही नेत्यांविरोधात पोलीस तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले."पक्षातील नेत्यांनी केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी उमेदवार म्हणून माझे नाव पुढे केले होते. त्यामागे त्यांचा काही स्वार्थ होता. त्यांनी मला दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराविषयी चुकीच्या गोष्टी बोलायला सांगिले, तसेच सध्याच्या सरकारविरोधात बोलायला सांगितले. यासोबतच प्रचारावेळी 'परदा' किंवा 'बुरखा' घालण्याचे आदेश मला देण्यात आले. मी या सर्वाला नकार दिल्यानंतर, पक्षातील नेत्यांनी माझे करिअर संपवण्याच्या धमक्या मला दिल्या"; असे आरोप अनन्या यांनी केले आहेत. केरळ विधानसभेत १४० जागांसाठी ६ एप्रिल २०२१ मतदान होईल. तर निवडणुकीचे निकाल २ मे २०२१ ला लागतील. राज्याची ही १५ वी विधानसभा निवडणूक असणार आहे. २०२१ मध्ये १४० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget