रिया चक्रवर्तीने धरलाय साकीब सलीमचा हात, एकत्र एन्जॉय करतायत पार्टी!

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिचे नाव खूप चर्चेत होते. अभिनेत्याच्या मृत्यूनंतरच रियानेच या गोष्टीची पुष्टी केली होती की, ती सुशांतची गर्लफ्रेंड आहे. मात्र, त्यानंतर रियाला सुशांतच्या चाहत्यांनी ट्रोल केले होते. सुशांतच्या कुटुंबीयांनीही रियावर बरेच आरोप केले होते. यानंतर ड्रग्स प्रकरणात रियाला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर लोकांमध्ये तिच्याबद्दल बर्‍याच नकारात्मक गोष्टी पसरल्या. तथापि, आता रिया हळूहळू आपले जीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता अलीकडेचा रिया अभिनेता साकीब सलीम  सोबत दिसली होती. दोघेही अलिबागहून पार्टी करून येत होते.यादरम्यान हे दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसले. रियाने प्लेन टी शर्ट आणि जीन्स परिधान केले होते, तर साकीबने शर्ट व पँट परिधान केली होती. दोघेही मीडियासमोर उभे राहिले नाहीत आणि तेथून थेट निघून गेले. असे म्हटले जात आहे की, रियाने साकीबचा वाढदिवस अलिबागमध्ये साजरा केला आहे आणि यावेळी मनीष मल्होत्रा ​​देखील त्यांच्यासोबत होता.काही दिवसांपूर्वी रियाने एक फोटो शेअर केला आणि प्रेमाबद्दल काही गोष्टी लिहिल्या होत्या. तिने एका मैत्रिणीबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये दोघींनी हाताने हार्ट तयार केले होते. हा फोटो शेअर करताना रियानेही लिहिले, ‘प्रेम म्हणजे ताकद … प्रेम म्हणजे एक कपडा ज्याचा रंग कधीच हलका होत नसतो. कितीही धुतले तरी फरक पडत नाही.’

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget