महाराष्ट्रात पुन्हा कडकडीत लॉकडाऊन लागण्याची शक्यता

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच चालला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आजपासून संपूर्ण लॉकडाऊन करण्यात असल्याचे बोलले जात आहे.राज्यातील वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता पुढील १५ दिवस कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा लॉकडाऊनही गेल्या वेळेप्रमाणे लॉकडाऊनसारखाच कडक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यामध्ये कोविडचे आकडे वाढतायत. हे पाहिल्यानंतर राज्यामध्ये फारच भयंकर आणि भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. वाढणारे आकडे खाली आणायचे असल्यास कठोर निर्बंध घेण्याची आवश्यकता आहे. अनेक निर्बंध घालूनही लोक फिरत आहेत, वाहने मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, त्यामुळे कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget