जम्मू काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये आज पहाटेपासूनच दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करत याबाबत माहिती आहे. त्राल भागामध्ये ही चकमक सुरू आहे. दरम्यान, शोपियानमध्येही गुरुवारी रात्रीपासून एक चकमक सुरू आहे, ज्यामध्ये आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.त्राल भागामध्ये दहशतवादी लपून बसलेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी याठिकाणी शोधमोहीम राबवली. यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यानंतर जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.दुसरीकडे, शोपियानमधील शोधमोहीम अद्याप सुरू असून, या परिसरात आणखी दोन दहशतवादी लपून बसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget