परमबीर सिंग यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर आज मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय यासंबंधित इतर याचिकांवरही सुनावणी होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी होत आहे. परमबीर सिंग यांच्यावतीने विक्रम ननकानी यांनी बाजू मांडत आहेत. तर, अ‌ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकारच्या वतीने बाजूने मांडली.गेल्या सुनावणीदरम्यान परमबीर सिंग यांच्या याचिकेवरील आदेश राखून ठेवण्यात आला आहे. तर इतरांच्या याचिकेवरील निर्णय अंतिम आदेशासाठी राखीव ठेवला आहे. राज्य सरकारला या आरोपांमधील तथ्य शोधून काढायचे आहे. आरोपांविषयीचे तथ्य बाहेर आणायचे आहे त्यामुळे ही जनहित याचिका फेटाळावी, असा युक्तिवाद कुंभकोणी यांनी केला होता. यानंतर न्यायालयाने तथ्य मांडण्यास सांगितले. त्यामुळे आज याप्रकरणी काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तुम्ही पोलीस अधिकारी आहात, जेव्हा आपल्याला या गुन्ह्याबद्दल कळल तर एफआयआर नोंदवणे आपले कर्तव्य होते. परंतु, आपण तसे केले नाही. तुम्ही तसे का केला नाही. एखाद्या सामान्य माणसालाही एखाद्या गुन्ह्याबद्दल माहिती मिळाल्यास एफआयआर दाखल करणे अपेक्षित असते. परंतु पोलिस अधिकारी म्हणून  गुन्हा घडतोय हे माहिती असूनही एफआयआर दाखल केलेला नाही, हे तुमचे अपयश आहे, असे मुख्य न्यायमूर्तींनी परमबीर सिगांना सुनावले होते.तुम्ही पोलीस आयुक्त आहात, तुमच्यासाठी कायदा बाजूला ठेवला पाहिजे का? पोलीस अधिकारी, मंत्री आणि राजकारणी सर्व कायद्यापेक्षा श्रेष्ठ का? स्वत: ला कायद्यापेक्षा मोठे समजू नका, कायदा तुमच्यावर आहे, असे खडे बोल न्यायमूर्तींनी सुनावले. सध्या राज्याचे पोलीस तपास करतील, असे न्यायमूर्ती म्हणाले. 

परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका फेटाळल्यानंतर त्याच दिवशी हायकोर्टात याचिका दाखल करु असे सांगतिले. मात्र तीन दिवसांनतर याचिका दाखल केली. अ‌ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी जनहित याचिका सुनावणी होण्यासारखी नाही, असा युक्तिवाद केला होता.हायकोर्टाने जनहित याचिकेचं वैयक्तिक याचिकेत रुपांतर करावे का?, अशी विचारणा केली असता कुंभकोणी यांनी परमबीर सिंग यांनी जनहित याचिकेत कोणताही वैयक्तिक उद्देश नसल्याचा उल्लेख केला आहे हे वाचून दाखवले. कुंभकोणी यांनी एका निकालाचा दाखला देत या प्रकरणी चौकशीचे आदेश देणे योग्य होणार नाही असा युक्तिवाद केला. आणखी एका निकालाचा दाखला देत या प्रकरणात दोन्ही हात आणि मानसिकता देखील दुषित असल्याचा युक्तिवाद कुंभकोणी यांनी केला.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget