देना बँकेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक


नवी मुंबई - देना बँकेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने खारघरमधील एका व्यक्तीकडून एक लाख ७० हजार रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. गोरखनाथ विठोबा कराड असे या भामट्याचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.तक्रारदार कालिदास पवार (६२) हे खारघरमध्ये राहाण्यास असून ते नेरूळ सेक्टर-१९ मधील श्रीकृष्ण मंदिरात पूजापाठ व प्रवचनासाठी नियमित जात असतात. याच ठिकाणी चार वर्षांपूर्वी पवार यांची ओळख कराड याच्यासोबत झाली होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये आरोपी गोरखनाथ याने देना बँकेत त्याचा नातेवाईक कामाला असल्याचे व त्याच्या माध्यमातून तो देना बँकेत पैसे भरून नोकरीला लावून देत असल्याचे पवार यांना सांगितले होते. त्यावेळी पवार यांनी पुतण्या विक्रम याला नोकरी लावण्याविषयी कराड याला सांगितले होते. त्यावेळी कराड याने साहेबांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून कालिदास पवार यांच्याकडून २० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर गोरखनाथने बँकेतून कॉल सुटणार असल्याचे सांगून ४० हजार रुपये, मेडिकलसाठी ४० हजार रुपये, तसेच बँकेच्या परीक्षेसाठी १० हजार रुपये अशी एकूण १ लाख १० हजार रुपयांची रक्कम पवार यांच्याकडून उकळली. त्याचप्रमाणे कराड याने पवार यांच्या ओळखीतील चव्हाण या व्यक्तीकडूनही ६० हजार रुपये उकळले. इतकी रक्कम उकळल्यानंतरही कराड याने नोकरीसंदर्भात काहीच कार्यवाही केली नाही. त्याला नोकरी संदर्भात विचारल्यावर त्याने वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पवार यांनी गोरखनाथ कराड याची माहिती काढली असता, त्याने अनेक व्यक्तींचीही अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचे त्यांना समजले.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget