अर्णब गोस्वामीला उच्च न्यायालयाचा तूर्तास दिलासा

मुंबई - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अलिबाग न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा अर्णबला मिळाली आहे.इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने पत्रकार अर्णब गोस्वामीला दिलेली सवलत कायम ठेवली आहे. शुक्रवारी न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पिटाळे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.मे २०१८ मध्ये झालेल्या अन्वय नाईक आत्महत्ये प्रकरणी फिरोज शेख आणि नितीश शारदा यांच्यासमवेत गोस्वामीवर आरोप आहेत. थकबाकी न मिळाल्यामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींवर नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित एफआयआर रद्द करावा यासाठी तिन्ही आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिन्ही आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.या प्रकरणाशी संबंधित याचिकेवर २३ एप्रिलला सुनावणी करू, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पोलिसांनी ४ नोव्हेंबर २०२० रोजी गोस्वामीला अटक केली होती. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. अर्णब गोस्वामी यांनी पैसे दिले नाही म्हणून अन्वय नाईक या इंटीरियर डिझायनरने २०१८ मध्ये आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांच्या आईनेही आत्महत्या केली होती. नाईक यांनी आत्महत्या करताना रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे नाव चिट्ठीमध्ये लिहून ठेवले होते. त्यानंतरही अर्णब यांची चौकशी केली जात नसल्याचा आरोप नाईक यांच्या पत्नी व मुलीने केला होता. त्यानुसार सीआयडी चौकशी करून अर्णबला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget