माजी खासदार पप्पू यादव यांना अटक

पाटणा - बिहारमधील मधेपुरा लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार आणि जन अधिकार पार्टीचे नेते पप्पू यादव यांना अटक करण्यात आली आहे. पाटणा पोलिसांनी ही कारवाई केलीय. पप्पू यादवविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पप्पू यादव यांनी भाजप खासदार राजीव प्रताप रुडी  यांच्या गावाजवळ डझनभर अॅम्ब्युलन्स पकडल्या होत्या. खासदार निधीतून या सर्व अॅम्ब्युलन्स खरेदी केल्या होत्या. पप्पू यादव यांच्यावर सरकारी संपत्तीचे नुकसान करणे आणि कोव्हिड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.पप्पू यादव यांनी स्वत: ट्विट करुन आपल्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईची माहिती दिली. “मला अटक करुन पाटण्यातील गांधी मैदान पोलीस स्टेशनला नेले आहे”, असे ट्विट पप्पू यादव यांनी केले.

दरम्यान, पप्पू यादव यांनी आजच आणखी एक ट्विट केले होते. “कोरोना काळात जर जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून मदत करणे गुन्हा असेल तर मी गुन्हेगार आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री साहेब मला फाशी द्या किंवा जेलमध्ये पाठवा. झुकणार नाही, थांबणार नाही. लोकांना वाचवणार, बेईमानांचा पर्दाफाश करणार”, असे पप्पू यादव म्हणाले.पप्पू यादव यांच्यावर आरोपानुसार, त्यांनी लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करत, अमनौर इथे जाऊन, विश्वप्रभा केंद्राबाहेर उभ्या असलेल्या अॅम्ब्युलन्सची पाहणी केली होती. FIR नुसार पप्पू यादव उर्फ राजेश रंजन ७ मे रोजी आपल्या कार्यकर्त्यांसह अॅम्ब्युलन्स पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कोरना नियमांचे उल्लंघन केले. इतकेच नाही तर त्यांनी अॅम्ब्युलन्सची तोडफोड केल्याचाही आरोप आहे.दरम्यान, पप्पू यादव यांनी अचानक भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या गावी धाड टाकली होती. तिथे डझनभर अॅम्ब्युलन्स उभ्या असल्याचे दिसले. लोकांना रुग्णालयात जाण्यासाठी अॅम्ब्युलन्स मिळत नसताना, इतक्या अॅम्ब्युलन्स उभ्या असल्याने पप्पू यादव यांनी राडा केला होता. या अॅम्ब्युलन्स खासदार निधीतून खरेदी केल्या होत्या. त्यातून काही प्रश्न उपस्थित होत आहेत.पप्पू यादवच्या आरोपांवर राजीव प्रताप रुडी यांनी उत्तर दिले आहे. ड्रायव्हर उपलब्ध नसल्याने या अॅम्ब्युलन्स इथे उभ्या असल्याचे रुडी म्हणाले. यानंतर पप्पू यादव यांनी ट्विट करत, एका दिवसात मी सर्व अॅम्ब्युलन्सवर ड्रायव्हरची व्यवस्था करु शकतो असे म्हटले होते.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget