ऑक्सिजनचे रिकामे सिलिंडर घेऊन ट्रकचालकाचे पलायन

नवी मुंबई - बेंगळुरू येथील व्हाइट रायझिंग या ट्रस्टने करोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची मदत मिळवून देण्यासाठी नवी मुंबईतून मागविलेले तीन लाख ९० हजार रुपये किमतीचे ऑक्सिजनचे ६० रिकामे सिलिंडर एका ट्रकचालकाने घेऊन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. रमेश परमार असे या ट्रकचालकाचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्यानंतर सरकारकडून तसेच विविध संस्था-संघटनांकडून गरजवंत रुग्णांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बेंगळुरूमधील व्हाइट रायझिंग या ट्रस्टने देखील गरजवंत रुग्णांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र या ट्रस्टकडे सिलिंडरची कमतरता असल्याने त्यांनी रुग्णालयाच्या साहित्याचा पुरवठा करणारे नवी मुंबईतील रवींद्र नाडार यांना गेल्या महिन्यात २५ एप्रिल रोजी संपर्क साधून त्यांच्याकडे ऑक्सिजनचे ६० रिकामे सिलिंडर पाठवून देण्यास सांगितले होते. हे सिलिंडर करोनाबाधित रुग्णांसाठी लागणार असल्याने नाडार यांनीदेखील तत्काळ रबाळे एमआयडीसीतील सिद्धांश गॅसेस या कंपनीकडून ऑक्सिजनचे ६० रिकामे सिलिंडर ताब्यात घेतले. त्यावेळी ट्रस्टने या सिलिंडरची तीन लाख ९० हजार रुपये कंपनीला पाठवून दिले. मात्र लॉकडाउन असल्यामुळे बेंगळुरू येथे सिलिंडर घेऊन जाण्यासाठी वाहन उपलब्ध न झाल्याने ३ मे रोजी नाडर यांनी एपीएमसीतील ट्रक टर्मिनल येथे जाऊन ट्रकचालकाचा शोध घेतला.यावेळी ट्रक टर्मिनलच्या बाहेर नाडार यांना भेटलेला रमेश परमार या ट्रकचालकाने तामिळनाडू येथे जात असल्याचे सांगितल्याने नाडार यांनी त्याला बेंगळुरू येथील व्हाइट रायझिंग या ट्रस्टच्या पत्यावर ऑक्सिजनचे ६० सिलिंडर पोहोचविण्यास सांगितले. तसेच, त्यासाठी आठ हजार रुपयांची रोख रक्कमही दिली. त्यानुसार ट्रकचालक परमारने ट्रकमधून ६० सिलिंडर भरून नेले. मात्र ते सिलिंडर त्याने बेंगळुरू येथे पोहोचवलेच नाहीत. त्यामुळे नाडार यांनी त्याच्या मोबाइल फोनवर वारंवार संपर्क साधला मात्र, त्याचा फोन बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर ट्रकचालक रमेश परमार याने ऑक्सिजनचे सिलिंडर घेऊन पलायन केल्याचे लक्षात आले. त्यामुळे नाडार यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी फरार ट्रकचालकाचा शोध सुरू केला आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget