मुंबईकरांना महापौरांनी केली कळकळीची विनंती

मुंबई - देशातील करोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर क्षमतेपेक्षा जास्त ताण पडला आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीही अशीच असून, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सकारात्मक चित्र दिसत आहे. मात्र, दुसऱ्या लाटेचा धोका अद्याप टळलेला नसल्याने आणि त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता असून, मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी मुंबईकरांसमोर हात जोडले.महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,”४५ ते ६० वयोगटातील जे लोक दुसऱ्या डोजसाठी येतील, त्यांना प्राध्यान्यक्रम दिला जाईल. लसीकरणासाठी नोंदणी केल्यानंतर आणि मेसेज आल्यानंतरच १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस दिली जाईल. जशी लस उपलब्ध होईल, त्याप्रमाणे लसीकरण केंद्र सुरू राहतील,” अशी माहिती त्यांनी दिली.ज्या लोकांनी ‘को-विन’वर नावाची नोंदणी केली आहे आणि ज्यांना मेसेज आला आहे. त्यांनी लसीकरण केंद्रावर जावे. जोपर्यंत मेसेज येत नाही, तोपर्यंत नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊ नये. जर तुम्ही नोंदणी केली आहे, पण मेसेज आलेला नाही, अशा नागरिकांनीही लसीकरण केंद्रावर जाऊ नये, असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केले.मास्क वापरण्याबद्दल महापौरांनी मुंबईकरांसमोर हात जोडले. महापौर म्हणाल्या,”मी प्रत्येकाला हात जोडून विनंती करते की, मास्क वापरा. दोन मास्क वापरावेत. लोकांनी कोणतेही कारण नसताना घराबाहेर जाणे टाळावे अशी माझी विनंती आहे,” असे म्हणत महापौर किशोरी पेडणेकर यांनी हात जोडून आवाहन केले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget