'बार्ज पी३०५' वरील ३७ कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले ; १८८ जणांना वाचवण्यात यश

मुंबई - तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या बार्ज पी३०५ वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून सुरू आहेत. आतापर्यंत बार्जवरील १८८ कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचविण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत ३७ कर्मचाऱ्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आयएनएस कोची ही पुन्हा एकदा अरबी समुद्रातील बार्जवर मदतकार्यासाठी गेली असून; आयएनएस कोलकाता ही बुधवारी रात्री उशिरा नेव्हल डॉक मध्ये परतली आहे. या बरोबरच तटरक्षक दलाकडून सुद्धा भारतीय नौदलाला मदत केली जात आहे. अरबी समुद्रातील बार्ज पी३०५ जवळच्या परिसरामध्ये भारतीय नौदलाच्या एअरक्राफ्ट व जहाजांकडून शोध कार्य सुरू आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget