कोरोना लस, ऑक्सिजन तुडवडा ; विरोधी पक्षांच्या नेत्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले असून मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. यातच कोरोना लस, ऑक्सिजन तुडवडा निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या १२ नेत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले आहे. देशात कोरोना महामारी रोखण्यासाठी मुक्त लसीकरण मोहीम राबवणे, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प स्थगित करणे आणि त्या पैशाचा कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी उपयोग करण्याची मागणी केली आहे.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन अशा देशातल्या एकूण १२ पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्तपणे हे पत्र पाठवले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget