कोट्यवधी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या 'बंटी-बबली'ला अटक


बदलापूर - बदलापूर शहरातील १५ नागरिकांची विविध प्रकारचे आमिष व भूलथापा देऊन १ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका जोडप्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. बदलापूर पूर्व पोलिसांनी ही कारवाई केली. सध्या पोलीस कोठडीत असलेले हे 'बंटी-बबली' दोघे पती-पत्नी असून हायप्रोफाइल भामटे असल्याचे पोलीस तपासात समोर आले. महेंद्र दोंदे आणि पल्लवी दोंदे अशी या दोन आरोपींची नावे आहेत.बदलापूर पूर्व भागातील नवीन डीपी रोडवर वैशाली देशमुख (वय ३६) यांचे श्री सद्गुरू कृपा मॅचींग सेंटर नावाने साडीचे दुकान आहे. काही महिन्यांपासून आरोपी दोंदे दाम्पत्याने व्यापारी असलेल्या वैशाली यांच्याशी मैत्री केली. त्यानंतर मैत्रीचा फायदा घेत, विश्वास संपादन करून ३ डिसेंबर २०२०ला नातेवाईकाच्या लग्नात जायचे आहे, त्यामुळे चार दिवसांसाठी दागिने वापरण्यासाठी घेतले. वैशाली यांनीही आरोपी नवरा-बायकोच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांना ४ लाख ६२ हजार रुपयांचे दागिने चार दिवसात परत करण्याच्या अटीवर दिले. मात्र, आरोपींनी मुथूट फिनकॉप यांच्याकडे हे दागिने गहाण ठेवले. त्याच्या कर्जाचे हफ्ते न भरता दोघेही बदलापुरातून पसार झाले. आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यावर वैशाली यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेऊन पती-पत्नी विरोधात तक्रार दाखल केली. वैशाली देशमुख या महिलेच्या अगोदर १२ ते १५ नागरिकांना दुपट्ट रक्कमेचे अमिष दाखवून आरोपींनी लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे फसगत झालेल्या काही नागरिकांनी पैसे परत मिळावे म्हणून तगादा लावला असता, या दोघा पती-पत्नीने लाखोंचे धनादेशही दिले होते. मात्र, ते सर्व धनादेश वटलेच नाहीत. हे सर्व गंभीर फसवणुकीची प्रकरणे पाहता पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला. तांत्रिक बाबी व मोबाईल लोकेशनवरून दोघांना मुंबईतून अटक केली. आतापर्यंत यो दोघांनी १५ नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget