रियाझ काझी यांच्या बडतर्फीचे आदेश

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी धमकी आणि व्यवसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी, निलंबित सहायक पोलीस निरीक्षक रियाझ काझी यांना शुक्रवारी बडतर्फ करण्यात आले.  मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी विशेषाधिकार वापरत काझी यांच्या बडतर्फीचे आदेश  दिले.या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी सचिन वाझे यांना प्रत्येक पावलावर मदत केल्याचे पुरावे हाती येताच राष्ट्रीय तपास यंत्रणेने काझी यांना अटक केली. ते गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागात (सीआययू) नेमणुकीस होते. तर या विभागाच्या प्रमुखपदी वाझे यांची नियुक्ती करण्यात आली होती. दोन्ही गुन्हे केल्यानंतर वाझे यांच्या आदेशानुसार काझी यांनी महत्वाचे तांत्रिक पुरावे नष्ट केले, असा आरोप एनआयएने केला आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget