भाजपा नगरसेविकेच्या पतीचा राडा, रूग्णालयात इनोव्हा घुसवून तोडफोड

नाशिक - रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा झाला नाही म्हणून भाजपा नगरसेविका सीमा ताजणे यांच्या पतीने महानगरपालिकेच्या बिटको रूग्णालयातील साहित्याची मोडतोड केली. ही घटना शनिवारी (१५ मे) संध्याकाळी घडली. रुग्णांना रेमडेसिवीर मिळत नसल्याचा आरोप, मेन गेटची तोडफोडयाबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की भाजपा नगरसेविका सीमा ताजणे यांच्या पतीने नाशिक रोड येथील महानगरपालिका संचलित बिटको रुग्णालयाच्या मुख्य दरवाजातून थेट इनोव्हा कार रुग्णालयात घुसवली. यामुळे रूग्णालयाचे गेट उद्ध्वस्त करत साहित्याची तोडफोड करण्यात आली. रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा न झाल्याने ते संतापले होते. त्यामुळे त्यांनी अशाप्रकारे रूग्णालयाची तोडफोड केली, असे बोलले जात आहे. त्यानंतर ते तिथून निघून गेले.या घटनेमुळे रुग्णालयात काही काळ खळबळ उडाली होती. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नाशिक रोड पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलीस पथक याठिकाणी दाखल झाले.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget