‘एफसीआय’ लिपीकाच्या घरी ‘सीबीआय’चा छापा

भोपाळ - भोपाळमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपात ‘एफसीआय’च्या एका लिपीकाच्या घरी मारलेल्या छाप्यात सीबीआयने तब्बल २.१७ कोटी रुपये जप्त केले आहेत. एवढेच नाही तर ८ किलो सोने व नोटा मोजण्याची मशीन देखील हस्तगत करण्यात आली आहे.शुक्रवारी रात्री सीबीआयच्या पथकाने लिपीकाच्या घरी छापेमारी केली होती. आतापर्यंत २.१७ कोटी रूपयांचा खुलासा झाला असून, ही कारवाई लाच प्रकरणी करण्यात आली आहे. भ्रष्टाचार विरोधी पथकाने लाच प्रकरणी विभागीय व्यवस्थापकासह चार जणांना रंगहात पकडले होते.भोपाळमधील छोला भागात लिपीक किशोर मीरा मीणाच्या घरी अद्यापही सीबीआयची कारवाई शनिवारीही सुरु होती. याचबरोबर सीबीआयला भ्रष्टाचाराचे काही पुरावे देखील घरून मिळाले आहेत. सांगण्यात येत आहे की, अटक करण्यात आलेल्या तिन्ही व्यवस्थापकांचा भ्रष्टाचारा पैसा देखील लिपीक किशोर स्वतःकडेच ठेवत होता.गुडगावमधील एका सिक्युरिटी एजन्सीने भ्रष्टाचाराची तक्रार केल्यानंतर लिपीक किशोर मीना आणि व्यवस्थापकासह तीन जणांना लाच घेताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर पुढील कारवाई सुरू झाली होती. तपासात समोर आले की, हा लिपीक सर्वांचे लाचेचे पैसे आपल्याच घरी ठेवत होता. माहितीनुसार किशोर मीना या अगोदर एफसीआयमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता. मोठ्या लोकांसोबत भ्रष्टाचारात सहभागी झाल्याने त्याल लिपीक बनवले गेले होते.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget