‘बिग बॉस’चा नवा सीझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

मुंबई - छोट्या पडद्यावरचा शो बिग बॉसप्रेक्षकांना खूप आवडतो. या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये बिग बॉसचा १४ वा सीझन संपला, ज्याची विजेती रुबीना दिलैक ठरली. आता चाहत्यांना या शोच्या १५ व्या सीझनची प्रतीक्षा आहे आणि त्यादरम्यान, आगामी सीझनबद्दल काही अपडेट देखील समोर आल्या आहेत. बिग बॉस १४ च्या अंतिम सोहळ्यामध्ये सलमान खानने जाहीर केले होते की, १५ व्या हंगामात सामान्य लोकदेखील या कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकणार आहेत. म्हणजेच या पर्वात सेलिब्रेटींसह सामान्य लोक देखील बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत.या शोची ऑडिशन प्रक्रिया फेब्रुवारीमध्येच सुरू झाली होती. बिग बॉस १५ साठी ऑडिशनची प्रक्रिया २२ फेब्रुवारीपासून सुरू झाली आणि ३१ मे २०२१ पर्यंत चालणार आहे.सध्या बिग बॉस १५च्या प्रीमियरची तारीख ऑक्टोबर २०२१ असल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, अद्याप तारीख निश्चित झालेली नाही.स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, या वेळी निर्मात्यांना काही एक्स जोड्यांसह, सामान्य लोकांना देखील शोमध्ये आणायचे आहे. याशिवाय काही स्पर्धकांची नावे देखील पुढे आली आहेत.दिव्यांका सध्या खतरों के खिलाडी ११ मध्ये भाग घेण्यासाठी केपटाऊनमध्ये पोहोचली आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांनी या दोघांकडे संपर्क साधला. मात्र, या जोडीने शोला होकार दिला आहे की, नाही याची अद्याप खात्री नाही.बालिका वधूमध्ये काम करणार्‍या नेहा मर्दाने नुकतीच पुष्टी केली की, बिग बॉस १५ साठी तिच्याशी संपर्क झाला होता. नेहा म्हणते की, बायो बबलमध्ये शूटिंग केल्यामुळे तिला वाटते की, ती बिग बॉसच्या घरात मिनी ट्रायल देत आहे. ती म्हणाली, या अनुभवानंतर मी बिग बॉसमध्ये गेले तर मी एक प्रबळ दावेदार होईन आणि मी हा कार्यक्रम जिंकू शकेन.या शिवाय या शोमध्ये अभिनेत्री सान्या इराणी देखील दिसू शकते. या शोसाठी अभिनेत्रीला देखील ऑफर देण्यात आली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget