जॉन अब्राहमचा कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात

मुंबई - भारतात कोरोनाचा उद्रेक वेगाने वाढत आहे. कोरोना संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक सेलिब्रिटी या अडचणीच्या वेळी मदतीसाठी पुढे येत आहेत. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम यानेही आता मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी आपली सगळी सोशल मीडिया अकाऊंट्स स्वयंसेवी संस्थेकडे सोपवली आहेत. खुद्द जॉन यांने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे जॉनने लिहिले की, ‘सध्या आपला देश बर्‍याच संकटांशी लढा देत आहे. प्रत्येक मिनिटाला  असे बरेच लोक आहेत ज्यांना ऑक्सिजन, आयसीयू बेड, लस आणि खाण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे. तथापि, या कठीण काळात आपण सर्वजण एकमेकांना आधार देत आहोत.जॉनने पुढे लिहिले की, ‘आजपासून मी माझी सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स आमच्या भागीदार स्वयंसेवी संस्थेकडे सोपवत आहे. माझ्या अकाऊंटवर आता केवळ अशीच सामग्री पोस्ट केली जाईल, ज्यामुळे गरजू लोकांना मदत होईल. ही समस्या दूर करण्यासाठी मानवतेचा प्रसार करण्याचा काळ आहे. या युद्धात जिंकण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करूया. घरी रहा आणि सुरक्षित रहा.’


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget