थकबाकीसाठी मुंबईतील निवासी डॉक्टर आक्रमक

मुंबई - मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांना गेल्या नऊ महिन्यांपासूनचा अतिरिक्तक भत्ता देण्यात आला नाही. हा भत्ता न मिळाल्याने निवासी डॉक्टर संतप्त झाले असून त्यांनी लवकरात लवकर थकीत रक्कम न मिळाल्यास कोविड सेवेचे काम करणार नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच थकीत रक्कम मिळावी म्हणून या डॉक्टरांनी सोशल मीडियावरून जोरदार कॅम्पेनही सुरू केली आहे. पालिकेच्या निवासी डॉक्टरांनी थकीत रकमेसाठी महापालिकेला काम बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर सोशल मीडियावरून कॅम्पेन सुरू केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर #BMCbetrayedus आणि #BetrayedStillWorking हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला आहे. येत्या सात दिवसात आमच्या थकीत रकमेवर तोडगा न काढल्यास कोरोनाचे काम करणार नसल्याचा इशारा मार्डने दिला आहे. आम्हाला कोरोना रुग्णांची सेवा थांबवायची नाही. त्यामुळे पालिका आम्हाला तसे करण्यास प्रवृत्त करणार नाही याची आशा आहे. आम्ही आमच्या मागण्यांची पोस्टर्स हॉस्पिटलबाहेर लावली आहेत. प्रश्न मार्गी लागेपर्यंत आमचे आंदोलन आम्ही सुरूच ठेवू, असे मार्डचे मुंबईचे अध्यक्ष अरुण घुले यांनी सांगितले.मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सायन, नायर, केईएम आणि कुपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना पालिकेकडून त्यांना देण्यात येणारा १० हजार रुपये कोविड भत्ता हीच पगारवाढ असून गेल्या ९ महिन्यांपासून देण्यात आलेली नाही. मे २०२० मध्ये सरकारी निवासी डॉक्टरांचा पगार म्हणजे विद्यावेतन १ हजार रुपयांनी वाढवले तरी पालिका रुग्णालयातील ३००० डॉक्टरांना दहा हजार रुपयांची पगारवाढ मिळालेली नाही. ही थकबाकी लवकरात लवकर मिळावी अशी या डॉक्टरांची मागणी आहे. गेल्यावर्षी पहिल्या लाटेच्यावेळीच हा भत्ता मिळणार होता. मात्र, तो अजून देण्यात आलेला नसल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. थकबाकीपोटी प्रत्येक डॉक्टरांचे प्रत्येकी सुमारे १.२ लाख रुपये थकले आहेत, असे मार्डने स्पष्ट केले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget