सर्वोच न्यायालयानंतर उच्च न्यायालयाकडून मुंबई महापालिकेचे कौतुक

मुंबई - कोविड काळात सरकारच्या कारभारासंदर्भात जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाकडून मुंबई महानगरपालिकेला शाबाशी मिळाली आहे. सर्वोच न्यायालयानंतर उच्च न्यायालयाकडून मुंबई महापालिकेचे कौतुक करण्यात आले आहे. "मुंबई महापालिकेची दूरदृष्टी आणि व्हिजन कौतुकास्पद आहे. कोरोना परिस्थितीत महापालिकेचे रुग्णालये आणि त्याचे योगदान हे उदाहरण देण्यासारखे आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर महापालिका मुंबई महापालिकेएवढ्या कार्यक्षम नाहीत" असे म्हणत मुंबई महापालिकेचे कौतुक केले आहे. तसेच इतर महापालिकांना मुंबई महापालिकेच्या पावलावर पाऊल टाकण्याचा सल्ला दिला आहे.समस्येकडेही न्यायालयाने वेधले लक्ष्यया सुनावणी दरम्यान कोर्टाने राज्य सरकारला ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भात विचारले की, "जर रुग्णांची संख्या कमी होत आहे, तर ऑक्सिजनची मागणी कमी का होत नाही? शेवटच्या सुनावणीवेळी ऑक्सिजनच्या आवश्यक पुरवठ्याबद्दल विचारले होते, तेव्हा ऑक्सिजनची आवश्यकता १७२० मेट्रिक टन एवढी सांगितली गेली होती. मात्र, जर आता रुग्णांची संख्या कमी होत आहे, तर ऑक्सिजनची गरज १७१८ मेट्रिक टन का? जर रुग्णांची संख्या कमी होत आहे, तर ऑक्सिजनची मागणी कमी का होत नाही?" असाही प्रश्न विचारला आहे. कोरोना काळात कमी पडलेल्या समस्येकडेही न्यायालयाने लक्ष्य वेधले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget