दिल्लीत लॉकडाऊन वाढवला

नवी दिल्ली - दिल्लीत करोनाचे संकट आणखी गडद होत असल्याने आठवड्याभरासाठी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. रुग्णवाढीचा वेग, कोलमडलेली आरोग्य व्यवस्था आणि ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालायवरील ताण कमी करण्यासाठी करोना साखळी तोडण्याचे आव्हान सरकारसमोर आहे.दिल्ली सरकारने एका आठवड्याने लॉकडाऊन वाढवल्याने आता १० मे रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत निर्बंध लागू असणार आहेत. मागील दोन आठवड्यांपासून दिल्लीत लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्याची मुदत सोमवारी सकाळी ५ वाजता संपणार होती. मात्र करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सरकारने आणखी आठवडाभर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दिल्लीत लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढवले आहे’, असे ट्विट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget