तौक्ते चक्रीवादळाचा कहर ; महाराष्ट्र ते गुजरातपर्यंत दाणादाण

मुंबई - तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाडांची मोठी पडझड झाली आहे. रस्तावरच मोठमोठी झाडे पडल्याचे पाहायला मिळाले. तर कित्येक घरे, दुकाने आणि गाड्याचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी नागरिक जखमी देखील झाले आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत कालच्या दिवसात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यांमुळे अनेक झाडे झाडांच्या मोठमोठ्या फांद्या तुटून पडल्या. यामध्ये काही जणांना प्राण गमवावे लागले, तर कोणाला गंभीर दुखापत झाली आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावासमुळे पाणी भरले. तर ठाणे जिल्ह्यात काल दिवसभर वीज गेली होती. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क्सही मिळत नव्हते. त्यामुळे लोक प्रचंड वैतागले होते. काही भागात तर घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला.सोमवारी रात्री उशिरा गुजरातच्या किनारपट्टी भागात तौक्ते वादळ धडकले. यावेळी ताशी १८५ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.

अरबी समुद्रातून आलेल्या या वादळामुळे मुंबईत तांडव निर्माण झाले होते. गुजरातला जाणाऱ्या दोन बोटी बेपत्ता झाल्या. 

मुंबईत तौक्तेमुळे ६ लोकांचा मृत्यू झाला असून ९ लोक जखमी झाले आहेत. काल मुंबईत ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.

कुलाब्यात सर्वाधिक ताशी १०८ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले.

प्रचंड हवेमुळे मुंबईत ठिकठिकाणी झाडे कोसळले आहेत. रस्त्यावर आणि सोसायट्यांच्या आवारातही वृक्ष उन्मळून पडल्याने पालिकेचे कर्मचारी हे वृक्ष हटवण्याचे काम करत आहेत.

वादळामुळे मुंबईतील खार येथे होर्डिंग्ज कोसळल्या. अनेक ठिकाणी पाणी भरले. त्यामुले अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे.

काल मुंबईत लोकल, विमान आणि मोनोरेल्वेही बंद ठेवण्यात आली होती. वांद्रे-वरळी सी-लिंकही बंद ठेवण्यात आला होता.

वादळामध्ये सापडलेल्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर एनडीआरएफची टीम तैनात ठेवण्यात आली आहे.

वादळामुळे मुंबईतील विविध कोविड सेंटरमधील ६०० कोरोना रुग्णांना इतरत्र शिफ्ट करण्यात आले आहे.

मुंबईप्रमाणेच वडोदरामध्येही कोविड सेंटरमधील ७० रुग्णांना इतर रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे.

गुजरातच्या सोमनाथमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. सोमनाथहून दीवला जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. हा रस्ता उघडण्याचे काम सुरू आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget