जोगेश्वरीत कोविड केअर सेंटरचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई - कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा धोका हा लहान मुलांना मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्वभुमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्या पुढाकारातुन लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था असणारे १४० बेडच्या कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.जोगेश्वरी पश्चिमच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने एस.आर.ए. चाँदीवाला इमारतीमध्ये २८० ऑक्सिजन बेड्स असणारे कोरोना केअर सेंटर चालु करण्यात येणार आहे. "डॉक्टर फॉर यू" या संस्थेच्या सहकार्याने या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या १४० बेड संचालित करण्यात येणार आहेत. यापैकी आज ४० बेड्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित १०० बेड्स लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर होणारा परिणाम लक्षात घेता, त्यांच्यासाठी ३० बेड याठिकाणी प्रस्तावित असून यापैकी आज २ बेड तयार असल्याचे महापौरांनी सांगितले. मुंबईमध्ये प्रथमच लहान मुलांसाठी खाट तयार झाली असून लहान मुलांना याठिकाणी खेळणी तसेच मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध करण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget