राजदचे माजी खासदार शाहबुद्दीन यांचे कोरोनाने निधन

नवी दिल्ली - राजदचे माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन यांचे कोरोनाने निधन झाले आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी ट्विट करून तशी माहिती दिली आहे. दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात शाहबुद्दीन यांचे निधन झाल्याचे वृत्त आले.तेजस्वी यादव यांनी ट्विट करून ही दु:खद बातमी दिली आहे. 

कोरोनाची लागण झाल्यानंतर माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन यांना मंगळवारी रात्री दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिल्ली हायकोर्टाने राज्य सरकार आणि तिहार जेल प्रशासनाला मोहम्मद शाहबुद्दीन यांना वैद्यकीय निगराणीखाली योग्य उपचार देण्याचे आदेश दिले होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्याचे निधन झाले.तेजस्वी यादव यांनी ट्विट करून शाहबुद्दीन यांच्या निधनाची माहिती दिली. माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन यांचे कोरोनामुळे अकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने राजदची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे संकट सहन करण्याचे बळ देवो. या संकटाच्या प्रसंगात राजद शाहबुद्दीन यांच्या कुटुंबासोबत आहे, असे तेजस्वी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, शाहबुद्दीन यांची प्रकृती गंभीर आहे, मात्र ते जिवंत आहे, असा दावा तिहार तुरुंग प्रशासनाने केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गोष्टी अफवा असल्याचे तिहार तुरुंगाच्या डीजींचे म्हणणे होते. गँगस्टर ते खासदार असा राजकीय प्रवास असलेला मोहम्मद शाहबुद्दीन सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात हत्या प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. शाहबुद्दीन हे बिहारमधील सीवन मतदारसंघातून राजदच्या तिकीटावर लोकसभा खासदार होते. त्यांच्याविरोधीत तीन डझनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. १५ फेब्रुवारी २०१८ रोजी सुप्रीम कोर्टाने त्याला बिहारच्या सीवन तुरुंगातून तिहार तुरुंगात नेण्याचे आदेश दिले होते.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget