कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या हॉस्पिटलला दणका, डॉक्टरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड - कोरोनाच्या काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहे. पण, अशाही परिस्थितीत खासगी हॉस्पिटलकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या घटना वाढल्या आहे. अखेर राज्य सरकारने दणका देत जास्तीचे बिल वसूल करणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील चाकणमध्ये खासगी हॉस्पिटल आणि डॉक्टरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी राज्य सरकारने दराबाबत नियमावली जाहीर केली आहे. पण तरी सुद्धा खासगी रुग्णालयांकडून लाखो रुपयांची लूट सुरूच आहे. अखेर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बिल तपासून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.पिंपरी चिंचवडमधील चाकण क्रीटीकेयर  हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी विजय पोखरकर यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या उपचाराबद्दल हॉस्पिटल प्रशासनाने पुष्पा विजय पोखरकर यांना २ लाख ५३ हजार रुपयांचे बिल आकारले होते. त्यामुळे इतकी मोठी रक्कम भरण्याबाबत पुष्पा पोखरकर यांनी हॉस्पिटलकडे विचारणा केली, पण हे बिल भरावेच लागेल, असे सांगण्यात आले.विशेष म्हणजे, शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अवाजवी दर आकारून २ लाख ५३ हजारांची रक्कम रुग्णाला भरण्यास सांगितली होती. या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाला रक्कम शासकीय नियमाप्रमाणे द्यावी, अशी सूचना करण्यात आली होती. वारंवार सूचना करूनही हॉस्पिटल प्रशासनाकडून कोणतीची दखल घेण्यात आली नाही. अखेर या प्रकरणी चाकण क्रीटीकेयर हॉस्पिटलला दणका देत संचालक डॉ. घाटकर आणि डॉ.स्मिता घाटकर यांच्यासह डॉ.राहुल सोनवणे आणि डॉ.सीमा गवळी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हे दाखल करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील बिलांची तपासणी केली जाणार अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराचा चांगलाच झटका बसला आहे.Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget