गुजरातमध्ये कोरोना बळींच्या आकड्यांची लपवाछपवी - चिदंबरम

नवी दिल्ली - गुजरात सरकारने कोरोना बळींचा आकडा लपवल्याची माहिती उघड झाल्यानंतर काँग्रेसने गुजरात सरकारसह केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि शक्तिसिंह गोहिल यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. गुजरातमध्ये १ मार्च ते १० मे पर्यंत १, २३, ००० मृत्यू प्रमाणपत्रं देण्यात आले. तर गेल्या वर्षी याच काळात ५८ हजार मृत्यू प्रमाणपत्रं देण्यात आले. त्यामुळे राज्यात तब्बल ६५ हजार मृत्यू वाढल्याचे दिसून आले असून हे धक्कादायक आहे. अचानक राज्यात मृत्यूचा आकडा वाढू शकत नाही. कोरोना किंवा इतर आजारांमुळेच हा मृत्यूचा आकडा वाढला असेल. किंवा इतर कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही मृत्यूची संख्या वाढली असेल. आम्ही या ७१ दिवसांच्या आकड्यांचीही खातरजमा केली. त्यानुसार गुजराती वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी आणि आमचे आकडे जवळपास बरोबर असल्याचे आढळून आल्याचे या काँग्रेस नेत्यांनी सांगितले.मृतांची संख्या अचानक वाढली आहे. नैसर्गिक मृत्यूमुळे ही संख्या वाढलेली नाही. महामारी किंवा कोणत्या तरी नैसर्गिक आपत्तीमुळे मृतांचा आकडा वाढला असावा. मात्र, कोविडमुळेच मृत्यूंची संख्या वाढली असावी अशी आम्हाला शंका आहे. मात्र, राज्य सरकार मृतांचा आकडा दाबत असल्याची आम्हाला शंका आहे, असे चिदंबरम म्हणाले. केंद्र सरकार काही राज्यांशी हात मिळवणी करून नव्या संक्रमणामुळे होणारे मृत्यूचे आकडे लपविण्याचं काम करत आहे. आमची शंका खरी असेल तर ही लज्जास्पद गोष्ट आहे. तसेच हा गंभीर गुन्हाही आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि गुजरात सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल. त्यांनी या प्रकरणावर खुलासा करावा अशी आम्ही मागणी करत आहोत, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.जगात कोणती ना कोणती कंपनी व्हॅक्सिन विकण्यासाठी तयार असेल. मात्र, कोणत्याच कंपनीसाठी केंद्राने अद्याप टेंडर काढलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. तर व्हॅक्सिनबाबत सरकार गंभीर नव्हते. संसदीय समितीने गेल्या वर्षीच शिफारस केली होती. तरीही लक्ष दिले गेले नाही, असे सांगतानाच व्हॅक्सिनबाबत इंडिया फर्स्ट हे धोरण का वापरले नाही? असा सवाल शक्तिसिंह गोहिल यांनी केला. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget