सलमानच्या ‘राधे’ चित्रपटाने केला नवा विक्रम

मुंबई - बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भारतात हा चित्रपट Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. परदेशात हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाने एक नवा विक्रम केले आहे.ईदला प्रदर्शित झालेला सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी ४.२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. सलमान खानने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ‘तुम्हाला ईदच्या खूप खूप शुभेच्छा. राधे हा चित्रपट पहिल्याच दिवशी सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे. तुम्हा सर्वांचे आभार’ असे त्याने कॅप्शन दिले आहे.सलमानचा ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ हा चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी यूएईमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार ‘राधे’ चित्रपटाने यूएई आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकूण ४ लाख डॉलर म्हणजेच २.९४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने इतकी कमाइ केल्यानंतर विकेंडला चित्रपट काय जादू करणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता हा चित्रपट सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे. ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटाणी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ, गोविंदा, गौतम गुलाटी, प्रविण तरडे हे कालाकार दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु देवाने केले आहे. या चित्रपटाची घोषणी २०१९मध्ये करण्यात आली होती. २०२० मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget