ममता बॅनर्जी ५ मे रोजी मुख्यमंत्रिपदाची घेणार शपथ

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला सत्ता राखण्यात यश मिळाल्यानंतर पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री होणार आहेत. ममता बॅनर्जी ५ मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांमद्ये २०० हून अधिक जागा मिळवण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला केवळ ७७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. डाव्या पक्षांचा गड समजला जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये डाव्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.प्रचंड अटीतटीच्या झालेल्या लढतीत नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना पराभव पत्करावा लागला. भाजपचे सुवेंदु अधिकारींनी ममतांचा १७३६ मतांनी पराभव केला. आधी ममतांनी १२०० मतांनी विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र पुर्नमतमोजणीत ममता बॅनर्जी यांचा १७३६ मतांनी पराभव झाला. याबाबत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. दरम्यान नंदीग्रामध्ये फेर मतमोजणीची मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे. ममतांनी म्हटले आहे, की बंगालच्या जनतेने भाजपला नाकारून देश वाचवला आहे. . नंदीग्रामच्या जनतेने दिलेल्या कौलचा मी आदर करते, असेही त्यांनी म्हटले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget