बंगालमधील हिंसाचारानंतर भाजपच्या सर्व आमदारांना एक्स दर्जाची सुरक्षा

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील भाजपच्या सर्व ७७ आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व आमदारांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येईल. या सुरक्षा ताफ्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ ) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कमांडोंचा समावेश असेल.पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर राज्याच्या अनेक भागांमध्ये तृणमूल काँग्रेसकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय समिती पश्चिम बंगालमध्ये पाठवली होती. या समितीने गृहमंत्रालयाला माहिती दिल्यानंतर भाजपच्या सर्व आमदारांना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला.७७ पैकी ६१ आमदारांना एक्स दर्जाची सुरक्षा असेल. तर १५ आमदारांसाठी वाय दर्जाची सुरक्षाव्यवस्था तैनात असेल. नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांना केंद्र सरकारने यापूर्वीच झेड दर्जाची सुरक्षा देऊ केली होती.एक्स ही केंद्र सरकारकडून पुरवण्यात येणारी सर्वात कमी दर्जाची सुरक्षाव्यवस्था आहे. यामध्ये तीन ते चार सशस्त्र कमांडोंचा समावेश असतो. तर वाय दर्जाच्या सुरक्षाव्यवस्थेत कमांडोंची संख्या ६ ते ७ इतकी असते. तर झेड दर्जाच्या सुरक्षाव्यवस्थेत संबंधित व्यक्तीच्या रक्षणासाठी ६ ते ९ कमांडो तैनात असतात. यामध्ये सुरक्षा ताफ्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ ) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कमांडोंचा समावेश असतो. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. यावेळी व्ही. मुरलीधरन यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप व्ही. मुरलीधरन यांनी केला होता.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget