पाच महिन्यांत २१६ कोटी कोरोना लशींचे डोस होणार उपलब्ध - डॉ. व्ही. के. पॉल

नवी दिल्ली - कोरोना लशीची प्रतिक्षा असलेल्या सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या पाच महिन्यात देशात २१६ कोटी कोरोना लस उपलब्ध होणार असल्याचे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. ही लस ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान उपलब्ध होणार असल्याची त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी रशियन कोरोना लस स्पूटनिक पुढील आठवड्यात देशातील बाजारपेठेत उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. मागणीच्या तुलनेत देशात कोरोना लशींचा पुरवठा कमी आहे.लसीकरण महत्त्वाचे, पण वेळ लागेल-डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, की लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र, त्याचे उत्पादन आणि उपलब्धता करून देण्यासाठी वेळ लागणार आहे. मर्यादित साठा असण्याच्या वेळेमधून आपण जात आहोत. त्यामुळे लसीकरणात प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने मोफत लसीकरण उपलब्ध करून दिले आहे. अतिजोखीम असलेल्या गटाला संरक्षण देणे हा हेतू आहे. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. देशातील संपूर्ण लोकसंख्येसाठी वर्षाखेर देशात लशींचे पुरेसे डोस उपलब्ध होणार आहेत, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. अनेक राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना लशींसाठी जागतिक निविदा मागविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगाणा या राज्यांचा समावेश आहे. एकीकडे कोरोनाचे प्रमाण वाढत असताना लसीकरणाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे देशभरातून केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेवर टीका होत आहे. राज्य सरकारकडून ४५ वर्षे वयावरील लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत वीस लाख लोकांच्या दुसऱ्या डोससाठी त्वरित २० लाख डोस देण्यात यावे, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्री आणि राज्याचे आरोग्य मंत्री यांच्यामध्ये लसीकरण, ग्लोबल टेंडरिंग आणि म्यूकरमायकोसिस या मुद्द्यावर चर्चा झाली. WHO ने मान्यता दिलेल्या लशीची पॉलिसी ठरवावी, असेही यावेळी आरोग्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget