पिनराई विजयन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

तिरुवनंतपुरम - केरळमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ अर्थात डाव्या पक्षाच्या सरकारला पुन्हा एकदा सत्ता आली आहे. या सत्तेत शरद पवार यांची राष्ट्रवादीही सहभागी आहे. दोन आमदार असूनही राष्ट्रवादीला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. शरद पवारांनी केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन आणि राष्ट्रवादीचे आमदार ए. के. शशीधरन यांना दुसऱ्या टर्मसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

केरळात पिनारायी विजयन यांनी मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. विजयन यांच्यासह राज्यपालांनी २० नेत्यांना मंत्रीपदाची शपथ दिली. मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. यात शरद पवार यांचा आमदारही आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने केरळमध्ये तीन जागांवर निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले आहेत. ए. के. शशीधरन आणि थॉमस के. थॉमस अशी त्यांची नावे आहेत. यात ए. के. शशीधरन यांना मंत्री पद देण्यात आले आहे. शशिंद्रन हे गेल्या सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. खातेवाटपाची घोषणा झाली नसल्याने यावेळस त्यांना कोणते मंत्रीपद मिळणार आहे, याबाबत अद्याप माहिती नाही.केरळातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि वाहतूक मंत्री ए के शशीधरन इलाथूर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले होते. शशीधरण यापूर्वी पाचवेळा आमदार होते. सुरवातीला ते काँग्रेसमध्ये होते. नंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर २०१७ मध्ये शशीधरन यांना मंत्रिमंडळातून पायउतार व्हावे लागले होते. मात्र, आरोप खोटे सिद्ध झाल्यानंतर ते पुन्हा मंत्री झाले.सेंट्रल स्टेडियममध्ये हा शपथविधीचा सोहळा झाला आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या जावयासह २० आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. विधानसभा आणि मंत्रिमंडळात सासरे आणि जावई यांचा समावशे असण्याची केरळमधील ही पहिलीच घटना आहे. नव्या मंत्रिमंडळात ३ महिलांना स्थान देण्यात आले आहे. पहिल्यांदा मंत्री होणाऱ्यामध्ये डीवायएफआचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विजयन यांचे जावई पी. ए. मोहम्मद रियास, सीपीएमचे कार्यवाहक राज्य सचिव ए विजयराघवन यांची पत्नी आर. बिंदू , जी. आर. अनिल, चिंचू रानी, पी प्रसाद आणि अहमद देवरकोविल यांचा समावेश आहे. तर जुन्या चेहऱ्यांमध्ये फक्त जेडीएस नेते के. कृष्णनकुट्टी आणि राष्ट्रवादीचे नेते ए. के. शशिंद्रन यांचा समावेश आहे. मागच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेल्या केके शैलजा यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. केके शैलजा यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget