बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव दिले असते - राज ठाकरे

मुंबई - नवी मुंबई विमानतळ स्वतंत्र नाही. हा मुंबई विमानतळाचा विस्तार आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव असले पाहिजे, असे सांगतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव दिले असते, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कृती समितीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाबाबतची वस्तुस्थिती मांडली. प्रशांत ठाकूर माझ्याकडे येऊन गेले. नवीन होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची त्यांची मागणी आहे. सरकारची भूमिका आहे बाळासाहेबांचे नाव देण्याची. त्याच्यातून हा संघर्ष सुरु आहे. मोर्चे, धरणे सुरु आहे. माझा पाठिंबा घेण्यासाठी ते आले होते. मी वस्तूस्थिती समोर ठेवली. कोणतेही विमानतळ येते, ते शहराबाहेर येते. तेव्हाची मुंबई पकडली तर ते विमानतळ सांताक्रूझला गेले. त्यावेळी मुंबई विकसित झालेली नव्हती. मग वाढवत ते सहारपर्यंत गेले आणि मग त्याला सांताक्रुझ विमानतळ आणि सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यात आले, असे राज म्हणाले.मागे जेव्हा असे विमानतळ बनवायचे ठरले तेव्हा जीव्हेके कंपनीला मी विचारले हे कसले विमानतळ आहे? त्यावर आताचे विमानतळ आहे ते डोमेस्टिक असेल, आणि ते विमानतळ आंतरराष्ट्रीय असेल. आता जे विमानतळ नवी मुंबईत होत असले तरी ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनच टेक ऑफ होणार आहे. त्यासाठी शिवडी-न्हावाशेव रोड होत आहे. ते मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळेच त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राहणार, असे कंपनीने मला सांगितले होते, असे त्यांनी सांगितलं.मुंबई विमानतळाचे ते एक्स्टेंशन आहे नवी मुंबईत. आंतराराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच नाव असेल असे मला तर वाटते. विमानतळांना नाव देण्याचे वगैरे हे केंद्र सरकार ठरवते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच होईल. बाळासाहेब हे आदरणीय आहेत, दि. बा. पाटील हे ज्येष्ठ नेते होते. असे असले तरी नवी मुंबई विमानतळ हा मुंबई विमानतळाचा विस्तार असल्याने त्याला शिवरायांचे नाव देणेच उचित ठरणार आहे. नवी मुंबईत असले तरी विमानतळ हे मुंबई विमानतळ म्हणूनच ओळखलं जाणार आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget