कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा, परिचारिकांचे कामबंद आंदोलन

मुंबई - फक्त कागदोपत्री कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा, असे म्हणत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून आज आणि उद्या (बुधवार-गुरुवार) दिवसभर कामबंद आंदोलन पुकारले आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देखील परिचारिका संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून आज आणि उद्या दिवसभर कामबंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. पाठीमागचे २ दिवस परिचारिकांनी सकाळी २ तास काम बंद आंदोलन केले पण कोणत्याही मागण्या न झाल्याने आता दोन दिवस कामबंद आंदोलन असणार आहे.

सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढे २५ तारखेपासून बेमुदत आंदोलन सुरु करु, असा इशारा परिचारिका संघटनांनी दिला आहे. बेमुदत संपावर जाण्याआधी सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करावा, असेही परिचारिका संघटनांनी म्हटले आहे.

काय आहेत परिचारिका संघटनांच्या मागण्या ?

१)कायमस्वरूपी पदभरती करा

२)केंद्राप्रमाणे आम्हाला देखील जोखीम भत्ता द्या

३)कोविड काळात ७ दिवस कर्तव्यकाळ आणि ३ दिवस अलगीकरण रजा कायम ठेवावी,

४)कोरोना काळात बंद करण्यात आलेली साप्ताहिक सुट्टी सुरू करावी… यासह अन्य काही मागण्या आहेत.

कोरोनाच्या काळात आम्ही कुठे कामात थांबलो नाही , काम केले आता सरकार मात्र आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही ही खेदाची बाब असल्याची खंत परिचारिका संघटना व्यक्त करत आहेत.राज्यातील सरकारी रुग्णालयातील नर्सकडून २१ जूनपासून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. केंद्राप्रमाणे आम्हालाही जोखीम भत्ता द्या, या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयातील नर्सने  कामबंद आंदोलन केले. यात जे.जे. रुग्णालयातील ३७५, सेंट जॉर्ज रुग्णालयातील १७५ आणि जीटी रुग्णालयातील १०० परिचारिका सहभागी झाल्या होत्या. त्याचसोबत राज्यभरातील सर्व शासकीय रुग्णालयांतील परिचारिकांनी सहभाग नोंदवला. या आंदोलनानंतर मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget