नर्सच्या विनयभंग प्रकरणी तरुणाला पालघरमध्ये अटक

पालघर - मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ड्युटीनंतर रविवारी रात्री शेवटच्या मेमूने घरी परतणाऱ्या तरुणीचा वाणगाव स्टेशनजवळ विनयभंग करण्यात आला. २२ वर्षीय तरुणाने नर्सचा मोबाईलही चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.तक्रारदार नर्स रविवारी रात्री आपले काम संपवून डहाणू येथील आपल्या घरी निघाली होती. विरारहून तिने रात्री १० वाजून ५० मिनिटांनी सुटणारी शेवटची मेमू (ट्रेन) पकडली. वाणगाव स्थानकाजवळ आरोपी महिला डब्यात शिरला. त्याने नर्सच्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

नर्सने बहादुरी दाखवत त्याचा प्रतिकार केला आणि आपला मोबाईल परत मिळवला. मात्र त्यावेळी त्याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. डहाणू स्टेशन येताच नर्सने आरडाओरडा केला. मात्र तिने सांगितलेल्या वर्णनावरुन रेल्वे पोलिसांनी सतर्कता दाखवली आणि पळून जात असलेल्या आरोपीला पकडले.तरुणावर पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात चोरी आणि विनयभांगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक योगेश देवरे यांनी सांगितले.


Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget