दहशतवाद्यांचा माजी पोलीस अधिकाऱ्याच्या घरात घुसून गोळीबार

श्रीनगर - जम्मूमध्ये ड्रोन हल्ला घटनेच्या २४ तासांच्या आतच दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पुलवामा येथे एका माजी विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) फैयाज अहमद यांना गोळ्या घालून ठार केले. पुलवामामधील अवंतीपोरा येथील हरिपरिगम गावात ही घटना घडली. दहशतवाद्यांनी एसपीओ फैयाज अहमद यांच्या घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. या दहशतवादी कारवाईत फैयाजचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहीद फयाज अहमद यांच्या पत्नीचेही रुग्णालयात निधन झाले. तर मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दहशतवाद्यांनी रात्री अकराच्या सुमारास फैयाज अहमद यांच्या घरात घुसून कुटुंबावर गोळीबार केला. त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, एसपीओ फैयाज अहमद आणि त्यांची पत्नी राजा बेगम यांनी दम तोडला. मुलगी रफियावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागाला घेराव घालण्यात आला असून शोध मोहीम सुरू आहे.

शनिवारी काश्मीरमध्ये ग्रेनेडमध्ये हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकल्यानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. ग्रेनेड फेकलेल्या दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाकडून शोध सुरू आहे. ग्रेनेडचा स्फोट झाल्यानंतर मोठे नुकसान झाले नाही. यापूर्वी दहशतवाद्यांनी ७ मे रोजी श्रीनगरमधील नवा बाजार परिसरातील सुरक्षा दलावर ग्रेनेड फेकले होते. शोपियान जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातल्यानंतर ग्रेनेड फेकल्याची घटना समोर आली होती.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget