मुंबई मनपा निवडणुकांपूर्वी प्रभाग पुनर्रचना, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. तत्पूर्वी वॉर्ड डिलिमेटेशन म्हणजे प्रभाग रचना होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. डिलिमिटेशन करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस आग्रही आहे. तर भाजपचा मात्र याला विरोध आहे. प्रभागांचे सीमांकन बदलल्यास कोर्टात जाण्याचा इशारा भाजपने दोन दिवसांपूर्वीच दिलेला आहे.राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवि राजा यांना पत्र पाठवले आहे. प्रारुप प्रभाग रचना जाहीर करणार असून त्यानंतर हरकती आणि सूचना मागवणार असल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे. रवि राजा यांनी २०१७ मध्ये निवडणूक आयोगाला पत्र लिहून भाजपने भौगोलिक सलगता न ठेवता आपल्या सोयीच्या दृष्टीने सुमारे ४५ प्रभागांची रचना केल्याची तक्रार केली होती. त्यामुळे संबंधित प्रभागांची रचना बदलण्याची मागणी त्यांनी केली होती.पालिका अधिनियमानुसार दर पाच वर्षांनी निवडणुकीपूर्वी प्रभाग रचना करण्याचा नियम आहे. त्यामुळे नियमानुसार ही प्रभाग रचना होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

कोरोनामुळे अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. मात्र मुंबई महापालिकेची निवडणूक ठरल्या वेळेतच होण्याची चिन्हं आहेत. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२२ मध्ये संपत आहे. त्यामुळे त्यावेळीच निवडणूक होणे अपेक्षित आहेत. मात्र सध्याची कोरोनाची स्थिती आणि संभाव्य तिसरी लाट पाहता, त्याबाबत त्या त्या वेळी निर्णय घेतला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेला कळवल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते.

मुंबई महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र लिहिले होते. मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका आहे. साहजिकच या महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या खिशात ठेवण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड सुरु असते. बीएमसी निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. म्हणजेच अद्याप जवळपास ९ महिन्यांचा कालावधी निवडणुकीला शिल्लक आहे. आधीपासूनच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget