राज्यात कडक निर्बंध लादल्याने व्यापारी वर्गात नाराजी

मुंबई - डेल्टा प्लस विषाणूचा धोका आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे राज्यात सोमवारपासून पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू झाले आहेत. या निर्बंधामुळे व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये सरकार विरोधात नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.मुंबई आणि मुंबई उपनगरासह आसपासच्या परिसरामध्ये तिसऱ्या स्तरांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. "ब्रेक द चैन" अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये पुन्हा एकदा वाढ करताना जमाव व मेळावे, धार्मिक स्थळ, खासगी प्रशिक्षण वर्ग, कौशल्य केंद्र, हॉटेल आणि पर्यटन स्थळासंदर्भात काही क्षेत्रांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचा यावेळी धोका देखील वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण व्यापारी संघटना मात्र आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.रिटेल ट्रेडर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी या नवीन निर्बंधासंदर्भात आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी असे सांगितले की, या निर्बंधांमुळे व्यवसायाला खूप त्रास होणार आहे. यामुळे ई-कॉमर्स कंपन्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. अशा प्रकाराच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील व्यवसायाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. कारण अनेक दुकानांना ओवरहेड, देखभाल शुल्क, पगार वाढ, वेतन, अतिरिक्त खर्च असे अनेक सारे खर्च आहेत. या निर्बंधामुळे हे खर्च पुन्हा भरून काढता येत नसल्यामुळे व्यावसायिक मात्र डबघाईला जाणार आहेत. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget