नवी मुंबईत लस तुटवडा ; लस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप

नवी मुंबई - शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत असून महापालिका प्रशासनाने वेगवान लसीकरणाची तयारी करीत १०४ केंदे सज्ज ठेवली आहेत, मात्र लस तुटवडा कायम असल्याने लसीकरणाचा पेच वाढला आहे. २५ जून रोजी ९०० लस कुप्या उपलब्ध झाल्याने लस कोणाला द्यायची, हा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला होता.लसीकरण केंद्रांवर रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. त्यात १८ वर्षांवरील लसीकरण सुरू करण्यात आल्याने लसीकरणासाठी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत.शहरात करोनाची दुसरी लाट ओसरत असताना शहरात पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत आहे. करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सध्या तरी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने नागरिकांना राहत्या घराजवळ लसीकरण करण्यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. एकूण १०४ लसीकरण केंद्रांचे नियोजन असून प्रत्यक्षात ७४ केंद्रावर लसीकरण करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यसाठी येणाऱ्या लस कुप्या अल्पप्रमाणात मिळत असल्याने पालिकेची अडचण निर्माण झाली आहे. त्यातच १८ वर्षांवरील लसीकरणही सुरू करण्यात आले आहे. लस उपलब्ध होत नसल्याने पालिकेच्या मोजक्याच रुग्णालयाच्या केंद्रावर होत आहे. तिथेही फक्त १०० मात्रा मिळत आहेत. लस उपलब्धतेनुसार टोकन देण्यात येत आहे, परंतु नागरिकांनी टोकन वाटण्यासाठीच विरोध होत आहे. त्यामुळे लसीकरणाची मोहीम विस्कळीत झाली आहे. शुक्रवारी पालिकेला फक्त ९०० लस मिळाल्यामुळे अधिकच गोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे योग्य लससाठा प्राप्त झाल्याशिवाय लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या लसीकरण प्रमुख डॉ.रत्नप्रभा यांनी सांगितले.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget