अभिनेता करण मेहराच्या अडचणी वाढल्या, पत्नी निशाने दाखल केला दुसरा गुन्हा

मुंबई - ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण मेहरा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. करण मेहरा याची पत्नी निशा रावल हिने करणवर दुसरा गुन्हा दाखल केला आहे. ३१ मेला सुद्धा करणवर निशाने घरगुती वादाप्रकरणी आरोप लावत गुन्हा दाखल केला होता. करण मेहराची पत्नी आणि अभिनेत्री निशा मेहरा हिने करणवर इच्छे विरुद्ध अत्याचार केल्याचे आरोप लावत गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. तसेच करणच्या घरातील सदस्य अजय मेहरा, बेला मेहरा आणि कुणाल मेहरा या तिघांवर ही तिने मारहाण आणि जाणीवपूर्वक त्रास दिल्याचे आरोप लावले आहेत. इतकेच नाही तर बँक अकाउंटमधून करणने तब्बल एक कोटींपेक्षा अधिकची रक्कम काढल्याचे आरोप ही निशाने करणवर लावला आहे. त्यामुळे करणच्या अडचणी वाढल्या आहेत. पती करण मेहरा याच्याविरोधात एफआयआर नोंदविल्यानंतर अलीकडेच निशा रावल हिने माध्यमांशी बोलताना संपूर्ण परिस्थिती सांगितली. स्वतःवर झालेल्या हल्ल्यानंतर तिने त्याचे काही फोटो देखील माध्यमांना दाखवले. हे फोटो समोर आल्यानंतर, आपला बचाव करत करणने निशाला ‘वेडी’ म्हटले होते. त्याला उत्तर देताना निशा म्हणाली होती की, ‘मी मानसिक आजाराने ग्रस्त होते, पण आता माझ्यावरील उपचार पूर्ण झाले आहेत आणि मी पूर्णपणे ठीक आहे’.मीडियाशी बोलताना निशाने सांगितले होते की, करणचे दिल्ली स्थित एका मुलीशी अफेयर सुरु आहे. त्याला आता तिच्याबरोबर राहायचे आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो चंदीगडमध्ये शूटिंग करत होता. जिथे माझ्या विचारण्यावर आता त्याने काबुल केले आहे की, त्याचा त्या मुलीशी भावनिक आणि शारीरिक संबंध आहे. ज्यामुळे त्याला घटस्फोट हवा आहे. पण ३१ मेच्या रात्री आमच्यात काही वाद झाले आणि त्यावेळी त्याने माझे डोके भिंतीवर आपटले आणि त्यानंतर माझ्या कपाळातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतरच मी त्याच्यावर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला.तब्बल सात वर्ष करण ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. यात त्याने नैतिक सिंघानियाची भूमिका साकारली होती. शोमध्ये तो अभिनेत्री हिना खानसोबत दिसला होता. करण मेहरा या शोमधून प्रचंड हिट ठरला होता. सध्या या शोमध्ये मोहसीन खान आणि शिवांगी जोशी मुख्य भूमिका साकारत आहेत. करण मेहराने बिग बॉस १० मध्येही भाग घेतला होता. गेले काही दिवस करण आपल्या आगामी पंजाबी प्रोजेक्टमध्ये व्यस्त होता आणि निशा आपल्या मुलासमवेत मुंबईत होती. २०१२ साली निशा आणि करणचे लग्न झाले. यानंतर, २०१७ मध्ये हे दांपत्य एका मुलाचे पालक बनले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget