देवेंद्र फडणवीस यांना संन्यास घेऊ देणार नाही ; सामानातून संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

मुंबई - ओबीसी आरक्षणाच्या नागपुरातील आंदोलना दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'आमच्या हाती सूत्र द्या, मी ओबीसींचे आरक्षण परत आणून दाखवतो आणि जर असे करून दाखवले नाही तर राजकीय संन्यास घेईल' अशी जाहीर ग्वाही दिली आहे. त्यावरून आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या उपरोधिक निशाणा साधत आम्ही त्यांना राजकारणातून सन्यास घेऊ देणार नसल्याचे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणले. त्यानंतर राज्यात सध्या ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाजासह विरोधी पक्ष भाजपा देखील सरकारच्या विरोधात आक्रमक झाले. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने २६ जूनला राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. त्यावेळी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमच्या हाती सत्ता दिल्यास तीन महिन्यात आरक्षण मिळवून देतो, आणि तसे नाही झाल्यास राजकीय सन्यास घेतो असे आवाहन केले होते. त्यावरून शिवसेनेने मुखपत्र सामानातूनही फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तर संजय राऊत यांनी राज्याला फडणवीस यांची गरज असल्याचे मत व्यक्त करत उपरोधिक टीका केली आहे.संजय राऊत म्हणाले की, देवंद्र फडणवीसांना आम्ही सन्यास घेऊ देणार नाही. राज्याला त्यांची गरज आहे. त्यांची वीरक्तीची भाषा हा महाराष्ट्रावर अन्याय होईल. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. देवेंद्र फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांना फकीर होण्याची भाषा योग्य नाही. फडणवीस लढवय्ये नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सहकार्य करावे, संन्यास वगैरे घेण्याची भाषा करु नये, त्यासाठी मी त्यांना स्वत: भेटून सांगेन, असेही संजय राऊत यांनी सांगितले. तर ओबीसी आरक्षण प्रश्नी सर्वकाही सुरळीत व त्यांच्या मनाप्रमाणे होईल. त्यामुळे त्यांचे दुष्मन संन्यास घेतील त्यांना सन्यास घेण्याची गरज नाही राज्याला त्यांची गरज असल्याचा उपरोधिक टोलाही राऊत यांनी सामनातून लगावला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget