२०१४ नंतरच्या इमारतींना अग्निसुरक्षा शुल्क आकारणार, पालिकेचा निर्णय

मुंबई - लॉकडाऊन आणि कोरोना संकटात आता मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण मुंबई महापालिका २०१४ नंतरच्या सर्व इमारतींकडून अग्निसुरक्षा शुल्क आकारणार आहे. एकीकडे कोरोना संकटाचे कारण देत महापालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी करवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दुसरीकडे अग्निसुरक्षेचे कारण देत, सरसकट इमारतींना शुल्क लावले जाणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आवळा देऊन, कोहळा काढला अशी प्रतिक्रिया आता विरोधक देत आहेत. दरम्यान, २०१४ नंतरच्या सर्व इमारतींकडून १० ते १५ रुपये प्रति चौरस मीटर दराप्रमाणे अग्निसुरक्षा शुल्क आकारले जाणार आहे. कोरोना संकटाचा हवाला देत मालमत्ता कर,पाणी पट्टीतील वाढ याला मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने विरोध केला. त्यामुळे करवाढीचा बोजा मुंबईकरांवर पडला नाही. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असतानाच आता अग्निसुरक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.ताबा प्रमाणपत्र देताना विकासकाकडून हे शुल्क एकदाच घेतले जाणार. मात्र याला भाजप आणि काँग्रेसने विरोध केला आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नाही का असा सवाल मुंबई महापालिकेतील काँग्रेस नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी विचारला आहे.

महत्त्वाचे म्हणजे ३ मार्च २०१४ नंतरच्या सर्व इमारतींकडून पूर्वलक्षी प्रभावाने अग्निसुरक्षा शुल्क वसूल केले जाणार आहे. रहिवासी क्षेत्रफळ, रहिवासी इमारती, हॉटेल, व्यावसायिक आस्थापने, एकूण क्षेत्रफळ यानुसार हे शुल्क घेतले जाणार आहे.गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांच्या डोक्यावर मालमत्ता करवाढीची असलेली टांगती तलवार अखेर दूर झाली आहे. मालमत्ता करात (Property Tax) १४ टक्के दरवाढ प्रस्तावित होती. मात्र, ही दरवाढ गेल्या आठवड्यात अखेर रद्द करण्यात आली. स्थायी समितीच्या बैठकीत मालमत्ता कराच्या दरवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी तो फेटाळून लावला.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget