रणवीर सिंग लवकरच करणच्या चित्रपटांत दिसणार?

मुंबई  - बॉलिवूडमध्ये अभिनेता रणवीर सिंगने आपली एक वेगळी छाप सोडली आहे. आपल्या करिअरला त्याने एक वेगळाच वेग दिला आणि सगळे रेकॉर्ड्स ब्रेक केले. अनेक सुपरहिट चित्रपट रणवीरने दिले. पण रणवीरविषयी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक , निर्माता करण जोहरने एक वेगळच भाकीत केले होते.

करण जोहरने आजवर अनेक नवोदित अभिनेते अभिनेत्रींना लाँच केले आहे. तर अनेकांच्या करिअरची सुरूवातच करणने केली आहे. करणने रणवीरच्या करिअरच्या सुरूवातीच्या काळावर एका मुलाखतीत भाष्य केले होते. करणच्या म्हणण्यानुसार त्याला सुरूवातीला रणवीर सिंगमध्ये हिरो सारखी कोणतीच गोष्ट दिसत नव्हती. २०१९ मध्ये एका मुलाखतीत करणणे हे सांगितले होते कि, “मला रणवीरमध्ये कोणतीच स्टार वाली गोष्ट दिसत नव्हती. मला वाटत होते त्याने चित्रपटांत येऊ नये.” पण रणवीरचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर करणने आपले मत बदलले तो म्हणाला, “रणवीरचे काम पाहिल्यावर मला वाटले हा मुलगा तर सुपस्टार आहे.”त्यानंतर करणने आणखी काही गोष्टींचा खुलासा केला होता. तो म्हणाला होता, “हा काळ सुपरस्टार्सचा नाही तर अभिनय करणाऱ्यांचा आहे. जर तुम्ही अभिनय करू शकत नसाल तर सुंदर बॉडी असणे निरर्थक आहे.” रणवीर सिंग लवकरच करणच्या दोन चित्रपटांत दिसणार आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget