जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला; तीन नागरिक जखमी

श्रीनगर - दशहतवाद्यांनी फेकलेल्या ग्रेनेडमध्ये तीन नागरिक जखमी झाले आहेत. ही घटना बारबारशाहमध्ये घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेआठ वाजता फेकल्याचे अनंतनाग पोलिसांनी म्हटले आहे.दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकल्यानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. ग्रेनेड फेकलेल्या दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाकडून शोध सुरू आहे. ग्रेनेडचा स्फोट झाल्यानंतर मोठे नुकसान झाले नाही.दहशतवाद्यांनी ७ मे रोजी श्रीनगरमधील नवा बाजार परिसरातील सुरक्षा दलावर ग्रेनेड फेकले होते. शोपियान जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातल्यानंतर हे ग्रेनेड फेकल्याची घटना समोर आली आहे. सैन्यदलाने चकमकीत दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात असलेल्या हांजीपोरा गावात एका दहशतवाद्याला ठार केले. हा दहशतवादी अवंतपुरामधील संभूरा येथील रहिवाशी आहे. मुर्तुजा अहमद दर असे या ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. तर दुसरा दहशतवादी सैन्यदलाला शरण आला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget