शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष - शरद पवार

मुंबई -  शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू असे कधी वाटले नव्हते. शिवसेना  हा विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मुंबईत घेतलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, या देशाने अनेक पक्ष पाहिले, काही टिकले. पण राष्ट्रवादीचे हे वैशिष्ट्य आहे २२ वर्ष शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले. सत्तेत आपण होतो, सत्ता गेल्यावर काही लोक गेले. पण नवीन लोक तयार झाले.हे आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. कोणी काही म्हणो, इथे आपण वेगळ्या विचारांचे सरकार स्थापन केले. सहकाऱ्यांच्या कष्टाने राष्ट्रवादीने २२ वर्ष पूर्ण केले. राजकारणात सतत काम करत राहाणे गरजेचे आहे. सत्ता ही महत्त्वाची आहेच, लोकांचे प्रश्न सोडावण्यासाठी सत्ता गरजेची आहे. मविआ सरकार ५ वर्ष टिकणार, नुसती टिकणार नाही तर लोकांसाठी कामही करणार, असे शरद पवारांनी सांगितले. देशात अनेक पक्ष बनले, काही टिकले तर काही कधी गायब झाले कळले नाही. राष्ट्रवादी योग्य दिशेने जात आहे. पक्षातून काही लोक गेले तर नवीन लोक तयार झाले. तीन पक्षाच्या सरकारला लोकांनी स्वीकारले, लोकांच्या याच विश्वासावर हे सरकार उत्तम सुरु आहे. सत्ता एकाच ठिकाणी राहू नये, एकाच ठिकाणी राहिल्याने सत्ता भ्रष्ट होईल, असे पवार म्हणाले.ओबीसी असो किंवा मराठा आरक्षण, हे प्रश्न सोडवावेच लागतील, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीवर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. मात्र त्या योग्य नाहीत, असेही पवारांनी स्पष्ट केले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget